पुणे रेल्वे स्थानक परिसरात पावणे अकरा लाखांचे मेफेड्रोन जप्त

पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरात कारवाई केली. एकाकडून दहा लाक ७६ हजार रुपयांचे ५३ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.), मोबाइल संच, रोकड, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धीरज राजेश कांबळे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवली आहे. कांबळे हा पुणे रेल्वे स्थानक परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कांबळेला पकडले. त्याच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच, दुचाकी, रोकड, इलेक्ट्रॅानिक वजनकाटा असा ११ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, योगेश मांढरे, संदीप जाधव आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply