पुणे : रात्री पावणे अकराला गडकरींनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन; आधी आरती केली अन् नंतर वारकऱ्यांसोबत केला हरी नामाचा गजर

पुणे : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात लाडक्या गणरायाचं प्रत्येकाच्या घरात वाजत गाजत आगमन झालं. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अनेक मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पुण्यात दिसलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला दिवसभरात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी एकच गर्दी केल्याचं पहायला मिळालं. त्याच दरम्यान राजकीय आणि कला क्षेत्रातील मंडळींनी देखील बाप्पाच दर्शन घेतले. आज रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.

यावेळी नितीन गडकरींच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. त्यानंतर उत्सव मंडपात असलेल्या वारक-यांसोबत टाळ हातात घेऊन रामकृष्ण हरी नामाचा गजर देखील केला. “पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले व श्रीगणेशाची आरती केली,” अशा कॅप्शनसहीत नितीन गडकरींनी दगडूशेठ गपणतीचं दर्शन घेतल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत.

यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन झाल्यानंतर कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील आणि ट्रस्टतर्फे महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply