पुणे : रविवार पेठेत जुन्या वाड्याची भिंत कोसळली ; ज्येष्ठ नागरिकाची सुटका

पुणे :  रविवार पेठेतील काची आळीत जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची घटना सायंकाळी घडली. वाड्यात अडकलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची सुटका करण्यात आली.

रविवार पेठेतील काची ओळीत जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला सायंकाळी सहाच्या सुमारास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. वाड्यात अडकलेले अरुण तापकीर (वय ७१) यांची स्थानिक रहिवाशांनी सुटका केली. असे त्यांचे नाव आहे. वाडा धोकादायक झाला होता. वाडा धोकादायक झाल्याची सूचना महापालिका प्रशासनाने वाडामालकाला दिली होती, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *