पुणे : मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार हॅाटेल व्यावसायिकाचा मृत्यू, कौन्सिल हॅाल चौकात अपघात

पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार हॅाटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना कौन्सिल हॅाल चौकात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

झाल दरायस खर्चेसी (वय ३९, रा. नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) असे अपघातातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार हॅाटेल व्यावसायिकाचे नाव आहे. खर्चेसी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. पहाटे पावणेतीनच्या सुमारास मोटार चालक कौन्सिल हॉल चौकातून साधू वासवानी चौकाकडे निघाला होता. त्यावेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार खर्चेसी यांना धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या खर्चेसी यांना पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान हॉटेल व्यावसायिक खर्चेसी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार या प्रकरणी तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *