पुणे : मुसळधार पावसामुळे शहरात २० ठिकाणी झाडे कोसळली; अग्निशमन दलाकडून फांद्या हटवून वाहतूक सुरळीत

पुणे : शहरात मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या झालेल्या मुसळधार पावसामुळे वीस ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. शुक्रवारी (८ जुलै) मध्यरात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत होता. शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे कोसळली. या घटनांची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.

शुक्रवार पेठेतील नेहरू चौकात वाड्याचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. लोहगाव परिसरात विमानतळ पोलीस चौकीजवळ, वडगाव शेरीतील पुण्यनगरी सोसायटीजवळ, बिबवेवाडीतील रम्यनगरी सोसायटीजवळ तसेच चिंतामणीनगर, दामोदर सोसायटी, भगली रुग्णालय, आंबेगाव पठार भागातील दत्तनगरमध्ये झाडे पडली. वानवडीतील जांभुळकरनगर, पाषाण परिसरातील सुतारवाडी, निम्हण बाग, बावधनमधील तपोवन सोसायटी, कोथरूड आयडियल कॉलनी, सहकारनगर तळजाई परिसर, भांडारकर रस्ता, बीएमसीसी महाविद्यालयाजवळ, विश्रांतवाडीतील विद्यानगर, सिंहगड रस्ता, औंध, बालेवाडी परिसरात झाडे पडल्याची नोंद अग्निशामक दलाने केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply