पुणे : मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र वडिलांना २० वर्ष सक्तमजुरी

नववीत शिकणाऱ्या मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सावत्र वडिलांना २० वर्ष सक्तमजुरी आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्ष अतिरिक्त दोन वर्ष भोगावा लागेल, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

याबाबत पीडीत मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ३० वर्षीय सावत्र वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने सावत्र वडिलांना २० वर्ष सक्तमजुरी आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. प्रमोद बोंबटकर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात पीडीत मुलीची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस नाईक अंकुश केंगले यांनी सहाय केले.

पीडीत मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने आरोपीशी विवाह केला होता. पीडीत मुलगी नववीत शिक्षण घेत होती. २०१७ मध्ये सावत्र वडिलांनी तिला वेळोवेळी धमकावून तिच्यावर बलात्कार केला होता. आईने तिला मुंब्रा येथे राहणाऱ्या मावशीकडे पाठविले होते. त्या वेळी तिने मावशीला या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयाने आरोपी सावत्र वडिलांना दोषी ठरवून बलात्कार प्रकरणी २० वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंड, धमकाविल्या प्रकरणी दोन वर्ष शिक्षा आणि १० हजार रुपये दंड आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन वर्ष शिक्षा आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत, असे न्यायालायने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply