पुणे :  खडकीत जुगार अड्ड्यावर छापा ; दहा जणांच्या विरोधात गुन्हा; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : खडकी बाजार परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तसेच रोकड, जुगाराचे साहित्य असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खडकी बाजार परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोकड असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दहा जणांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक श्रीधर खडके, प्रमोद मोहिते, अजय राणे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे आदींनी ही कारवाई केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *