पुणे : मुक्ता टिळक यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार

पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी अंत्यदर्शन आणि ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

उद्या सकाळी ८ ते ११.३० पर्यंत त्यांचे पार्थिव केसरीवाडा इथे ठेवण्यात येईल. त्यांनंतर अंत्यविधी वैकुंठ स्मशाणभूमीत करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे पुतणे रोहित टिळक यांनी दिली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *