पुणे : मांजरी रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य छत बसले प्रतिक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची

पुणे , मांजरी : येथील बहुप्रतिक्षीत रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीतील काम अंतीम टप्प्यात आले आहे. रूळावरील मुख्य छताचे काम सध्या सुरू असून महिना अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील काम धिम्या गतीने सुरू असल्याने पुलावरील वाहतूकीसाठी प्रवाशांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

या उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन पाच वर्षे होत आली आहेत. वारंवार मुदतवाढ घेऊनही त्याचे काम अपूर्णच आहे. थेट रेल्वे रूळावरील व रूळाखालील भुयारी मार्गाच्या कामासाठी घ्यावा लागणारा ब्लॉक, सुरूवातीला त्यामध्ये आलेल्या तांत्रीक अडचणी, यामुळे पुलावरून वाहतूक.सुरू व्हायला उशीर लागेल, असे निदर्शनास येते होते. मात्र, सध्याचे कामाचे चित्र पाहता रेल्वे रूळावरील काम अंतीम टप्प्यात आलेले दिसत आहे.

एकीकडे रेल्वेच्या अखत्यारीतील काम पूर्णहोत आले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामाला गती दिसत नाही. मुख्य पुलाच्या कामासह दोन्हीचे बाजूच्या सेवा रस्त्यांचे कामही रखडलेले आहे. काम पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना वेळोवेळी अश्वासने ऐकायला मिळत आहेत. मात्र, दिवसेंदिवस हे काम पुढे ढकलत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. दूरवरून करावा लागत असलेला प्रवास, पर्यायी रस्त्यांची दुरवस्था, अरूंद रस्ते, त्यामुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूककोंडी, वेळेच अपव्यय, इंधनाचा वाढलेला भार अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply