पुणे : महिलेचा पाठलाग करून छायाचित्र काढणारे खासगी गुप्तचर संस्थेतील दोन ‘डिटेक्टिव्ह’ गजाआड

पुणे : आरोग्य सल्लागार असलेल्या महिलेवर पाळत ठेवुन तिची गुप्त माहिती काढणार्‍या दोन खाजगी गुप्तहेरांनागुन्हे पोलिसांच्या शाखा 2 च्या पथकाने अटक केली आहे. कोरेगाव पार्क परिसरातून या गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश लक्ष्मणसिंग परदेशी (२५, रा. वडगाव मावळ, जि. पुणे) आणि राहुल गुणवंतराव बिरादार (30, रा. देहुगाव ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कोरेगाव पार्क परिसरात राहणार्‍या एका 32 वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही आरोग्य सल्लागार आहे. तिचे परदेशात शिक्षण झाले असून ती सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. सध्या या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. नेमके महिलेवर पाळत ठेवण्यासाठी कोणी सांगितले होते, त्यामागचे नेमके काय कारण आहे, याबाबत आमचा तपास सुरू आहे. लवकरच याचे कारण समोर येईल अशी माहिती देण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply