पुणे : महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर, कराडजवळ वाहतूक कोंडी

कराड : पुणे – बंगळुरू महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारासमोरील आणि मलकापूरच्या हद्दीतील पादचारी उड्डाणपुलास आकाराने उंच स्वरुपाचा कंटेनर जोराने धडकून अडकल्याने काही काळ वाहतूक खोळांबली होती. ही घटना आज गुरुवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

उड्डाणपुलाखाली अडकून राहिलेला हा कंटेनर आणि वाहतुकीची कोंडी यामुळे पोलिसांची एकच त्रेधा उडाली. अखेर मोठ्या कौशल्याने हा कंटेनर बाजुला करण्यात यश आल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आणि पोलीस व वाहनधारकांनी जणू सुटकेचा नि:श्वास टाकला. तर या धडकेत या पादचारी उड्डाणपुलाचे काही अंशी नुकसान झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यापूर्वीही या पादचारी उड्डाणपुलाला अशाच भल्यामोठ्या अवजड वाहनाची याच प्रकारे धडक बसल्याने त्याचे नुकसान झाले होते. आज पुन्हा या पादचारी उड्डाणपुलास अपघात झाला असून, पुलाचा एक बार तुटलेला दिसत आहे. आजवर दोन वेळा बसलेल्या अवजड वाहनांच्या जबरदस्त धक्क्यांनी पुलाचे खांब हालले आहेत. काही भागही कमकुवत झाला आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडण्यासाठीच्या पादचारी उड्डाणपुलाच्या सक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply