पुणे महापालिकेच्या आशिर्वादानेच फोफावले अतिक्रमण

पुणे - म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान नदी पात्रातील कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरुपातील शेडचे अतिक्रमण काढून टाकावेत असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) (NGT) दिले असले तरी त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. नवीन हॉटेल, मंगल कार्यालये होताना त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना पायाभूत सुविधाही पुरवल्या गेल्या. त्यामुळे नदी संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेनेच अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले असल्याचे समोर आले.

महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून शहराच्या विविध भागात ही कारवाई सुरू आहे. यामध्ये आत्तापर्यंत लाखो चौरस फुटावरील बांधकाम, शेड पाडण्यात आलेले आहे. महापालिकेच्या बांधकाम व अतिक्रमण विभागाने बुधवारी (ता. २०) म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानच्या डीपी रस्त्यावर जोरदार अतिक्रमण कारवाई केली. यामध्ये मंगल कार्यालय, हॉटेल, गॅरेज यासह इतर व्यावसायिकांवर कारवाई केली. पत्र्याचे शेड जेसीबी व गॅस कटरने पाडून टाकण्यात आले. त्यामुळे या भागातील ६८ अतिक्रमण जमीनदोस्त झाले आहे.

पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीमध्ये अतिक्रमण होऊ नये, त्यात झालेले बांधकाम पाडून टाकण्यासाठी आत्तापर्यंत चार ते पाच याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. तर २०१६ मध्ये ‘एनजीटी’ने देखील नदी पात्रात निळ्या रेषेच्या आता व हरित पट्ट्यात भराव टाकून केलेले कायमस्वरूपी बांधकाम व तात्पुरत्या स्वरुपातील शेडचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी केवळ दिखाऊ कारवाई झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा महापालिकेने कारवाई केली नाही. त्यामुळे गेल्याकाही वर्षात नवीन हॉटेल, मंगल कार्यालये, गॅरेज सुरू झाली. त्यांना महापालिकेने नळ जोड दिले आहेत. तर काहींनी अनधिकृत नळ जोड घेतले आहेत. अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांना पायाभूत सुविधा पुरविल्या गेल्याने

तसेच नदीपात्रात हे बांधकाम होताना या भागाची जबाबदारी असलेल्या बांधकाम निरीक्षकांपासून इतर अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. महापालिकेकडून केवळ नोटिसा दिल्या पण कारवाई केली जात नसल्याने या अतिक्रमणांना संरक्षण मिळाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply