
पुणे : करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या उपप्रकारामुळे जगाच्या काही भागात वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली तरी भारतातील रुग्णसंख्येत अद्याप मोठे बदल दिसत नाहीत ही सकारात्मक बाब आहे. पुणे शहरातही अद्याप करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या संपूर्ण नियंत्रणात आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, हे चित्र बदललेच तर नायडू रुग्णालयासह महापालिकेची सर्व रुग्णालये परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहेत, असा निर्वाळा पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
ओमायक्रॉन या करोनाच्या प्रकारामुळे २०२२ च्या सुरुवातीला करोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या करोना लाटेच्या तुलनेतही ओमायक्रॉनमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेमध्ये करोना रुग्णांची संख्या कित्येक पटीने अधिक होती. रुग्णांची संख्या जास्त असली तरी यांपैकी बहुसंख्य रुग्ण हे घरच्या घरी उपचार घेऊन बरे झाले. काही मोजक्या रुग्णांना रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज भासली. ओमायक्रॉनमुळे वाढलेली रुग्णसंख्या दीर्घ काळ कायम राहिली तरी गेल्या दोन महिन्यात ती नियंत्रणातही आली. सध्या पुणे शहरासह राज्यात रुग्णांची संख्या पूर्णपणे आटोक्यात आहे.
पुणे महापालिकेचे साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले,की महापालिका कार्यक्षेत्रात सध्या ३५ सक्रिय रुग्ण आहेत. यांपैकी एकही रुग्ण रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल नाही. सोमवारी (२६ डिसेंबर) अवघ्या एका नव्या रुग्णाला करोना संसर्गाचे निदान झाले आहे. ही आकडेवारी शहरातील करोनाचे चित्र पुरेसे स्पष्ट करणारी आहे.
परदेशातील रुग्णवाढ काळजीचे कारण असली तरी तेथील लोकसंख्येने घेतलेली लस आणि येथील लोकसंख्येने घेतलेली लस यांच्या परिणामकारकतेत मोठा फरक आहे. त्यामुळेच बीएफ.७ चा धोका उद्भवेल असे वाटत नाही, मात्र काही प्रमाणात रुग्णवाढ झाली तर परिस्थिती हाताळण्यास नायडू रुग्णालयासह महापालिकेची सर्व रुग्णालये सक्षम आहेत, हे डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
