पुणे : महसूल कर्मचारी संघटनेचा संप मिटला

पुणे : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती आणि बदल्या विभागांतर्गत करण्याचा तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या आश्‍वासनानंतर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत आंदोलन मागे घेतले. त्यामुळे काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रांत आणि तहसील कार्यालयातील रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.

महसूल विभागातील वरिष्ठ लिपिक आणि मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. पदोन्नती मिळालेल्या नायब तहसीलदार संवर्गाची राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी एकत्रित करण्यात यावी. तसेच महसूल सहाय्यक पदांची भरती करण्यात यावी. राज्य सरकारने रिक्त पदांची भरती न केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे सरकारने रिक्त पदे तत्काळ भरावीत.

चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच वाहन चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश जारी करावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

नायब तहसीलदार संवर्गाच्या पदोन्नती व बदल्या विभागांतर्गत करण्याबाबत आदेश झाले आहेत. यासह इतर मागण्यांबाबतही काही दिवसांमध्ये अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. रिक्त पदांबाबत जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे बेमुदत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे ‌ राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा हा मोठा विजय आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply