पुणे : मशिदीच्या भोंग्यावरून पुण्यात होणार खळ्ळखट्याक? मनसेचं पोलिसांना पत्र

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरेंनी 'यू टर्न' घेतला असा टीकेचा सूर आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला कृती कार्यक्रमही वादग्रस्त ठरला आहे. मशीदीच्या समोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, हे त्यांचं विधान चांगलंच वादग्रस्त ठरलं. त्यामुळं मनसेतील मुसलमान शाखा अध्यक्षांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेने पुण्यात आणखी एक पाऊलं उचललं आहे. सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने पोलिस स्टेशनला पत्र दिलं आहे.

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचे पुणे शहरात खळखट्याक उडणार का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने पत्र दिलं आहे. यासंदर्भात पुणे शहर मनसेकडून शहरातील पोलिस स्टेशनला पत्र लिहलं आहे. डेक्कन पोलिस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलिस स्टेशनला पत्र दिलं आहे. मनसेकडून या मशिदींना भोंगे काढण्यासाठी चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. भोंगे न काढल्यास दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची माहिती राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे.

मशीदीच्या समोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, हे त्यांचं विधान चांगलंच वादग्रस्त ठरलं. यानंतर मनसेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर येत आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर पुण्यात दुसरा राजीनामा पडला आहे. पुण्यातील माजीद अमीन शेख यांनी राजीनामा दिला आहे. तसेच मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजात सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षांचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं, असं म्हणत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply