पुणे : मंचरला मुस्लीम समाजाकडून शिवरायांचा जयजयकार, इस्राईलचा निषेध

मंचर - हिंदू मुस्लीम भाई भाई, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुस्थान की जय व मुस्लीम समाजाच्या मज्जीदचा ताबा घेणाऱ्या इस्राईलचा निषेध अश्या घोषणाबाजीनी मंचर परिसर दुमदुमून गेला होता. मंचर (ता. आंबेगाव) येथे इस्राईलच्या विरोधात हुसेनी ट्रस्ट मंचर यांच्यावतीने शुक्रवारी (ता. २९) निषेध मोर्चा काढण्यात आला. अग्रभागी मुस्लीम समाजाचे नेते राजू इनामदार, मौलाना वसीम जैदी, अल्लू इनामदार, रहेबर मिर, अमानत मिर, मन्सूर शेख, इरफान काजी, शरफ मिर, आदी मान्यवर होते.

मौलाना वसीम जैदी यांनी इस्राईल देशावर टीका केली. ते म्हणाले “मुस्लिम समाजाची जगातील अत्यंत महत्वाची “मस्जिद ए अक्सा” फिलिस्तीन येथे आहे. या मशिदीवर इस्राईलने १९४८ पासून चुकीच्या पद्धतीने ताबा घेतला आहे. सदर ताबा इस्राईलने सोडावा म्हणून सिया समाजाचे सर्वोच्च धर्मगुरु इमाम खुमैनी यांनी १९७९ पासून रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी निषेध मोर्चाचे आयोजन सुरू केले आहे. त्यानुसार मंचरला शुक्रवारी (ता. २९) निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.जुम्मा मशीद येथून मोर्चाचा शुभारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाची सांगता झाली.

“हिंदू व मुस्लीम या दोन्ही समाजात सतत असलेले शांतता व सामंजस्य वातावरण टिकवून ठेवण्याचे काम केले जाईल. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास तो हाणून पडला जाईल. राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देण्यासाठी हुसेनी ट्रस्ट मंचर सतत कार्यरत राहील.”



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply