पुणे : ‘भूखंडाचे श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे पुण्यात आंदोलन

पुणे : राज्याच नागपूर येथील हिवाळी अधिवेशन यंदाच विशेष चर्चेत आहे. अधिवेशनात एनआयटी भूखंडाच्या विषयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागणी लावून धरली. तर याविरोधात आंदोलन देखील केले. या आंदोलनाचे पुण्यात देखील उमटले असून भूखंडाचे श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज पुण्यातील अलका चौक येथे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नागपूर येथील ११० कोटीचा भूखंड ज्या ठिकाणी झोपडपट्टी वासियांची घरे तयार होणार होती.तो भूखंड केवळ 2 कोटीमध्ये विकला गेला आहे. यापूर्वीच ५० खोक्यामध्ये विकले गेलेले आमदार आत्ता भूखंड विकायला निघाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे.अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन केल जाईल असा इशारा देखील यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी राज्य सरकारला दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply