पुणे : बिबवेवाडी, धनकवडीत भरदिवसा घरफोडी सदनिकेतून दहा लाखांचा ऐवज लांबविला ; शहरात भरदिवसा घरफोडीचे सत्र कायम

पुणे : शहरात भरदिवसा घरफोड्यांचे सत्र कायम असून बिबवेवाडी, धनकवडी भागातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा लाखांचा ऐवज लांबविला.

याबाबत नवनाथ कांबळे (वय ४०, रा. गणेश व्हिला सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे कुटुंबीय सदनिका बंद करुन सकाळी बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून पाच लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. पोलीस उपनिरीक्षक खंडाळे तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत बिबवेवाडीतील अनंत वसाहत सोसायटीत भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ५१ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच ३० हजारांची रोकड, परदेशी चलन असा चार लाख एक हजारांचा ऐवज लांबविला. याबाबत मिलिंद भावसार (वय ६२, रा. अनंत वसाहत, कोठारी काॅम्प्लेक्स, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावसार यांच्या सदनिकेचे कुलूप चोरट्यांनी तोडून कपाटातील ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक सिसाळ तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply