पुणे – बिटकॉईनच्या तपासात सहभागी पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी

पुणे - बिटकॉईन  फसवणुक प्रकरणातील  पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, उच्चस्तरीय तज्ज्ञांची चौकशी समिती नेमावी, रविंद्र पाटील याची मालमत्ता जप्त  करावी अशी मागणी बिटकॉईन प्रकरणी फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी सोमवारी केली. तसेच बिटकॉईनच्या या प्रकरणामध्ये तब्बल दिड लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करुन त्याची कसून चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

बिटकॉईन गुंतवणुकीत फसवणुक झालेल्या नागरीकांनी सोमवारी पत्रकार परिषदत घेत विविध प्रकारच्या मागण्या केल्या. यावेळी गुंतवणुकदारांच्यावतीने हेमंत दवे व निशा रायसोनी यांनी माहिती दिली. दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकॉईन फसवणुक प्रकरणी दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज व इतरांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणाच्या तांत्रिक तपासासाठी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमलेल्या पंकज घोडे व रविंद्र पाटील यांनीच पोलिसांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्‍वासाचा गैरफायदा घेत तक्रारदार व आरोपींच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वतःच्या वॉलेटमध्ये वर्ग करीत पोलिसांचीही फसवणूक केली. या प्रकरणात केवळ त्यांचाच सहभाग नसून तत्काली पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप गुंतवणुकदारांनी केला.

या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी केली. याबरोबरच बिटकॉईन प्रकरणात अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचा सहभाग असून त्यांनी लाखो बिटकॉईनचा अपहार केलेला आहे. भारद्वाज बंधूनी केलेल्या बिटकॉईन चोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर महाराष्ट्रासह देभरात ४२ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून तब्बल दिड लाख कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. पोलिसांनी ब्लॉकचेनमध्ये बिटकॉईनचे व्यवहार अचूकपणे तपासण्यासाठी चैन अनॅलिसीस सॉफ्टवेअरची मदत घ्यावी. रवींद्र पाटील याने त्याच्या ‘केपीएमजी’ कंपनीच्या माध्यमातुन किती बिटकॉईन लंपास केले, याचा सखोल तपास करावा, त्यांच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि पाटीलची मालमत्ता जप्त करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply