पुणे : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर पिसोळी येथील बाह्यवळण मार्गावर आंबेकर चौकात तीन वाहनांचा विचित्र अपघात

उंड्री : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर पिसोळी (ता. हवेली) येथील आंबेकर चौकात दोन ट्रक आणि कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात जीवितहानी टळली मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना आज (बुधवार, ता. १४ डिसेंबर, २०२२) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी सांगितले की, आंबेकर चौकातून ट्रक वळण घेत होता, त्यावेळी मिक्सरचा ट्रक पुढे जात असताना कारला घासला गेला. त्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आशिष गरुड, पोलीस हवालदार राजाराम कोलते, महिला वाहतूक पोलीस प्रियांका विटकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार आणि मिक्सर ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *