पुणे : बनावट कागदपत्रे सादर करून दस्तनोंदणी या प्रकारात दोषी अधिकाऱ्यांचे होणार निलंबन

पुणे : बनावट एनए ऑर्डर, भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे दस्त नोंदणी प्रकरणांची नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गंभीर दखल घेतली असून, यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून दस्तनोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.  त्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली.

त्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ३ येथे मागील पाच महिन्यांत नोंदविलेल्या एक हजार ४७२ दस्तांची तपासणी केली असता सुमारे ११२ दस्त बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे नोंदविल्याचे आढळले. त्यामुळे बोगस कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नोंदणी विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार बोगस कागदपत्रे दाखवून सदनिकांची खरेदीदार व विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे.

सात प्रकरणांमध्ये तीन व्यक्तींवर हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. परंतु, एवढ्यावर न थांबता या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे.

संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये कोणी अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply