पुणे : फ्लो मीटरच्या कामासाठी पुणे शहरातील काही भागात बुधवार, गुरूवारी पाणी बंद

पुणे - महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेमध्ये टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या भागातील पाणी बंद आहे, तेथे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

बुधवारी पाणी बंद असलेला भाग

सणस पंपिग स्टेशन - नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली क्रमांक. बी १० ते बी १४

गुरुवारी पाणी बंद असलेला भाग

चतु:शृंगी टाकी परिसर - बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ॲम्युनिशन फॅक्‍टरी, अभिमानश्री सोसायटी.

पद्मावती टाकी परिसर - बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बॅंकनगर लेक टाऊन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.

नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र - ससाणेनगर, काळेबोराटे नगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply