पुणे : प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. हेमंत दाबके यांचे निधन

पुणे : ‘क्वाक्लियर इम्प्लांट’ ही कानावरील पुण्यातील पहिली शस्त्रक्रिया करणारे प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. हेमंत शंकर दाबके (वय ६०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुमेधा दाबके आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यापासून डॉ. दाबके आजारी होते. उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालविली. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील शिक्षणानंतर दाबके यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी संपादन केली. ससून रुग्णालयाचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. एम. जी. टेपणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उपचाराचे प्रशिक्षण घेतले. कर्वे रस्त्यावर दाबके नर्सिंग होम हा दवाखाना त्यांनी सुरू केला.

डॉ. दाबके यांनी १९९४ साली ऑस्ट्रेलियात जाऊन ‘क्वाक्लिअर इम्प्लांट’ या कानावरील शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी क्वाक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मांडके हेअरिंग सर्व्हिसेसच्या कल्याणी मांडके, कान -नाक-घसा तज्ज्ञ डॉ. नीलिमा वैद यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्या माध्यमातून दाबके नर्सिंग होममध्ये १९९६ साली पुण्यातील पहिली क्वाक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. त्यानंतर ऐकू येण्यामुळे कर्णबधिरांचे जगणे सुसह्य होऊ शकते असा विश्वास त्यांनी निर्माण केला. रुग्णांपासून ते वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत सर्वांना मदत कऱण्यामध्ये ते अग्रभागी होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply