पुणे : प्रशासनाला कोंडीत पकडण्यासाठी पुण्यात पीएमपी ठेकेदारांचा अचानक संप

पुणे : पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी आज सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ६०० बसची वाहतूक बंद झाली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे  म्हणणं आहे, तर हा दबावतंत्राचा भाग असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे. मात्र, या संपामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे.

दरम्यान, ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस (Notice) पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे. पीएमपीमध्ये सुमारे ७ खाजगी ठेकेदारांच्या ९५६ बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे ६५० ते ७०० बस दररोज मार्गांवर धावतात. या बसची वाहतूक शुक्रवार सकाळपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे पीएमपी प्रशासनाची तारांबळ उडाली. याविषयी एका खाजगी (Private) ठेकेदाराकडे विचारणा केली असता गेल्या ८ महिन्यांची १०७ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळाली नसल्याविषयी हा संप केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पीएमपीच्या सह व्यवस्थापिका संचालक डॉ. चेतन केरुरे म्हणाल्या की ठेकेदारांना गुरुवारी ५४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते पैसे आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. संप करण्याचे वेगळेच कारण आहे, ठेकेदारांकडून बस कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा निधी दिला जात नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आले होते. त्याची दखल घेऊन या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी वेळेत भरण्याचा त्यांना आदेश देण्यात आला आहे. तसेच याविषयी प्रशासनाने पडताळणी ही सुरू केली आहे, त्याचा राग येऊन हा संप झाला असावा, असे वाटते. परंतु, प्रशासनाने पीएमपीच्या १२०० पैकी जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच संपर्क करणाऱ्या ठेकेदारांना अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये नोटीस देखील बजावण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply