पुणे : प्रशासकच झेडपीच्या सर्व समित्यांचे अध्यक्ष असणार; कामकाजाचे वाटप

पुणे : जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद हेच झेडपीच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीसह सर्वच सर्व विषय समित्यांचे अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी कार्यरत असताना विविध विषय समित्यांमध्ये होणारे धोरणात्मक निर्णय आता प्रशासक घेऊ शकणार आहेत ‌ दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत पातळीवरील सर्व कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी प्रशासक प्रसाद यांनी खातेप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली उपसमित्यांची स्थापना केली आहे. विषय समितीनिहाय कोणते निर्णय घेणे आवश्यक आहे, यांची शिफारस या समित्या प्रशासकांना करतील, अशी या उपसमित्यांची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च सभा आहे. याशिवाय विविध बारा विषय समित्यांमध्ये स्थायी समिती दुसऱ्या स्थानावर आहे. जलसंधारण व स्वच्छता ही तिसऱ्या क्रमांकाची समिती मानली जाते. या तिनही समित्यांचे अध्यक्षपद हे जिल्हा परिषद अध्यक्ष भूषवित असतात. आता या तीनही सभांसह अन्य सर्व विषय समित्यांचे अध्यक्षपद प्रशासक या नात्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हेच भूषविणार आहेत. प्रथेनुसार जिल्हा परिषद अध्यक्षांकडे असलेल्या समित्या आणि सभांचे कामकाज पाहण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply