पुणे : पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

पुणे– रेल्वे पोलिसांच्या पोलीस कोठडीत असताना आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागेश रामदास पवार (वय २९, हडपसर, मुळ रा.मोहोळ, सोलापूर) असे मृत आरोपीचे नाव आहे.

पवार हा चोरीतील आरोपी आहे. पवार याला रेल्वे पोलिसांनी अटक करून १७ ऑगस्टला न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला २५ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी दिली होती. त्या दरम्यान पोलिसांनी त्याला मारहाण केली. त्यात तो आजारी पडल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला पोलीसच जबाबदार आहेत. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पवार याच्या नातेवाईकाने केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *