पुणे : पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन; ६६० गुन्हेगार आढळले; ७१ जणांना अटक

पुणे : आंतरराष्ट्रीय जी-२० परिषद आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणतीही अनुचित अप्रिय घटना घडू नये, यासाठी शहरात ११ ते १२ जानेवारीदरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांतील पथकांकडून या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन हजार ५८३ संशयित तपासण्यात आले.

त्यापैकी ६६० गुन्हेगार आढळून आले आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. हॉटेल, लॉजेस, एसटी बस, रेल्वे स्क्षानकांसह सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे.

गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांकडून विविध पथके स्थापन केली आहेत. त्यात गंभीर गुन्ह्यातील फरारी, तडीपार, मोकाच्या गुन्ह्यातील आरोपी तसेच कोयता गॅंगमधील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply