पुणे : पोलाद व्यावसायिकाचे चौकशी प्रकरण; आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

पुणे : शहरातील एका पोलाद व्यावसायिकाच्या चौकशी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.पोलाद व्यावसायिकाच्या चौकशीबाबत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. चौकशीत काही संशयास्पद बाबी आढळून आल्याने तातडीने बदलीची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती.

शहरातील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्याकडे होती. या प्रकरणाची चौकशी प्रामाणिक अधिकाऱ्याकडून करण्यात यावी, अशी विनंती बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. वजीर शेख यांच्याकडून तपास काढून घ्यावा, असे कडू यांनी पत्रात म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी वजीर शेख यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply