पुणे : पीएमपी बसखाली सापडून कामगार गंभीर जखमी; पीएमपी चालकावर गुन्हा; पुणे स्टेशन स्थानकातील घटना

पुणे : नादुरुस्त पीएमपी बस दुरुस्तीचे काम करणारा काम करणारा कामगार अचानक झालेल्या दुर्घटनेत बसखाली सापडून गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील पीएमपी आगारातील दुरुस्ती विभागात घडली. आकाश गंगाधर पेंडलवार (वय २३, रा. पिंपरी) असे गंभीर जखमी झालेल्या पीएमपी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी पीएमपी बस चालक संजय तुकाराम काळे (वय ४२, रा. नेहरुनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपी आगारातील कर्मचारी भगवान कांबळे (वय ४९) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळे पीएमपी चालक आहे. पुणे स्टेशन परिसरातील आगारात नादुरुस्त बसची दुरुस्तीचे काम कामगार आकाश पेंडलवार करत होता. बस उचलण्यासाठी टेकू (सपोर्ट डिस्क) लावण्यात आला होता. त्या वेळी आगारात पीएमपी चालक आरोपी संजय काळे बस घेऊन आला.

बस चालू अवस्थेत ठेवून काळे बसमधून खाली उतरला. त्या वेळी चालू अवस्थेतील बस नादुरुस्त बसवर आदळली. नादुरुस्त बसला लावलेला टेकू सरकला आणि बसखाली काम करणारा आकाश गंभीर जखमी झाला. पीएमपी चालक काळे याच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक माने तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply