पुणे : पिसोळी, उंड्री-महंमदवाडी ओढ्याची पालिका प्रशासनाने केली स्वच्छता

उंड्री : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने पिसोळी, उंड्री, महंमदवाडीकडे जाणाऱ्या ३३ फूट रुंद आणि दीड किमी लांबीच्या ओढ्याची स्वच्छता केली. मागिल वर्षी पुराच्या पाण्यात कामगार वाहून जात असताना नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याचे प्राण वाचविले होते. भिंताडेनगर, हिल्स अँड डिल्स सोसायटी, संस्कृती स्कूलशेजारून हा ओढा महंमदवाडीकडे जातो. मागिल वर्षी पावसाच्या पाण्याचा पूर आल्याने सोसायट्यांमध्ये आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते.

पूराच्या पाण्यात कार आणि एक व्यक्ती वाहून गेली होती. मात्र, सतर्क नागरिकांमुळे त्याचा प्राण वाचला आणि कारही नागरिकांनी पुरातून बाहेर काढली होती. यावर्षी अशी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी राजेंद्र भिंताडे, सुभाष घुले यांनी ग्रामस्थांच्या वतीने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ओढ्याची स्वच्छता केला. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे म्हणाल्या की, पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यामध्ये कोठेही पूरस्थिती होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ओढा स्वच्छतेची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply