पुणे : पिंपरी- चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या १५ इलेक्ट्रीक बाईक जळून खाक

पिंपरी- चिंचवडमध्ये आगीच्या घटनेत १५ इलेक्ट्रीक बाईक जळून खाक झाल्या आहेत. शहरातील तळवडे भागात त्रिवेणी हौसिंग सोसायटी येथे शॉर्ट सर्किटने आग लागली. यात १५ बाईक जळून खाक झाल्या आहेत. अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे. तसेच, पहिल्या मजल्यावरील चार जणांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढलं आहे. पार्किंगमध्ये इलेक्ट्रीक बाईक चार्जिंग लावली होती. तिथं, शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचं अग्निशमन जवानाकडून सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील त्रिवेणी नगर येथे त्रिवेणी हौसिंग सोसायटी या ठिकाणी पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किटनंतर चार्जिंग लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकला आग लागली. यात एकूण १५ इलेक्ट्रीक बाईक जळून खाक झाल्या आहेत. याबाबतची माहिती तळवडे अग्निशमन विभागाला मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. दरम्यान, भीषण आगीमुळे पहिल्या मजल्यावर अडकलेल्या चार व्यक्तींना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यात तीन मुलांसह ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. अग्निशमन विभागाचे मुकेश बर्वे, प्रतीक कांबळे, प्रदीप हिले, गोविंद सरवदे, दिनेश इंगलकर, अशोक पिंपरे यांसह इतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply