पुणे – “निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा”, राज ठाकरेंचा शरद पवारांवर नाव न घेता टोला!

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा होत आहे. गुढीपाडव्याची सभा त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा, औरंगाबादमधिल सभा झाल्यांनतर आज राज ठाकरे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत. राज ठाकरे कोणत्या विषयावरती बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंनी आजची सभा महत्त्वाची असणार आहे. संबंध महाराष्ट्रतून मनसैनिक पुण्यात आले आहेत. यावेळी सभेला संभोधित करताना राज ठाकरे यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आपल्या सभेला हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा मात्र त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की हल्ली आम्ही कुणालाच देत नाही. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला. दरम्यान मागच्या काही काळात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन मनसे कार्यकर्त्यांची धरपकड झाली होती. त्याचबरोबर राज ठाकरेंनी नियोजीत अयोध्या दौराही रद्द केला आहे. मशिदीवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यभरातील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. वसंत मोरे यांनीही भोंग्यांबाबतीत घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांना शहर अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावा लागले होते.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply