पुणे - नाशिक महामार्गावरील अपघातात दाेन ठार; रुग्णवाहिका चालक जखमी

पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दाेन जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात राजगुरूनगर शहरालगत झाला आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

या अपघाताबाबत पाेलीस म्हणाले पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरूनगर शहरालगत रुग्णवाहिका आणि दुचाकीच्या समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यु झाला आहे. तर रुग्णवाहिकेचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

मयुर पवळे, आतिष सोमवंशी असे अपघातात जागीच मुत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. दरम्यान 108 क्रमांकाची रुग्णवाहिका पुण्याच्या दिशेने जात हाेती. तर दुचाकी समाेरून येत हाेती. दाेन्ही वाहनांची धडक झाली. या रुग्णवाहिकेचा चालक महेश वालकोळी गंभीर जखमी झाला आहे.

 
 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *