पुणे : नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे: पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरुद्ध पथकाने नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ (एमडी, कोकीन) जप्त केले आहेत. पुण्यातल्या नालंदा गार्डन, बाणेर या ठिकाणी एक नायजेरियन पती-पत्नी राहत असून ते राहत्या घरातून कोकीन, एमडी असे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत या नायजेरियन पती-पत्नीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या नायजेरियन पुरुषाचे नाव उगुचुकु इम्यन्युअल तर त्याच्या पत्नीचे नाव ऐनीबेली ओमामा व्हीआन असे आहे. दोघेही मूळचे नायजेरियन आहेत, मात्र सध्या ते दोघेही बाणेरमध्ये राहत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी यो दोघा पती-पत्नीला अटक केली आहे. त्याच्याकडून बेकायेशीररित्या विकण्यासाठी आणलेल्या ६४४ ग्रॅम एमडी, २०१ ग्रॅम कोकेन, मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या आणि डबा असे सर्व मिळून सुमारे १ कोटी ३१ लाख ८ हजारांचे अंमली पदार्थ आणि त्यासाठीचे इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी एनडीपीसी ॲक्टनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply