पुणे : नाना पेठेतील वाड्याची भिंत कोसळली; दोन जण जखमी

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी दिवसभर पुणे शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. अशातच रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील एका वाड्याची भिंत कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाले. अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ पोचून भिंतीमध्ये अडकलेल्या जखमी व्यक्तीसह चार जणांना सुखरूप बाहेर काढले. 

शहरात रविवारी रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस होता. तर रात्री आठ वाजल्यापासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला. दरम्यान, शहरात पावसामुळे झाडपडीच्या १६ घटना दिवसभरात घडल्या. त्यानंतर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ३८६, नाना पेठे येथील मॉडर्न बेकरी समोरील एका दुमजली वाड्याची भिंत कोसळली. त्यामुळे या वाड्यात राहणारे दोघेजण भिंतीमध्ये अडकले. याबाबत अग्निशामक दलास माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच जवान घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. 

लाकूड, पत्रे, दगड, माती व चिखल बाजूला काढून अग्निशामक दलाच्या जवानांनी कमलाकर झिंजूर्के (वय ६४), राजेंद्र झिंजूर्के (वय ६०), भारती झिंजूर्के (वय ५०) अशा तिघांना तेथून बाहेर काढले. त्यापैकी दोघानी गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अन्य एकाची सुखरूप सुटका केली.

अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, जवान चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले , महेंद्र कुलाळ, विठ्ठल शिंदे, चंदकांत मेनसे, दिंगबर बांदिवडेकर, शिर्के व चालक अतुल मोहिते आणि कर्णे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply