पुणे: धरण उशाला अन् कोरड घशाला; खडकवासला धरणाच्या जवळच्या गावातच भीषण पाणी टंचाई

   

पुणे: पुणे शहराला  24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाला लागून असूनही, पुणे महानगरपालिका  हद्दीतील शिवणे, उत्तमनगर, कोंढवे - धावडे आणि कोपरे या गावातील नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रस्त आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती शिवणे, उत्तम नगर, कोंढवे-धावडे आणि कोपरे गावात निर्माण झाली आहे. याचाच निषेध करण्या करिता आज खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर आणि उत्तम नगर चे माजी सरपंच सुभाष नानेकर यांच्या नेतृत्वात हजारो महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून शिवणे, उत्तम नगर, कोंढवे-धावडे आणि कोपरे गावाला सुरळीत पाणीपुरवठ होत नसल्याने, या गावांवर भीषण पाणीटंचाईची वेळ ओढवली आहे, असा दावा यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आला. खडकवासला धरणा लगतची गावे महानगरपालिका मध्ये समाविष्ट होऊन पाच वर्ष लोटली तरी पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या गावाना सुरळीत पाणीपुरवठा करत नाही त्यामुळे आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply