पुणे : ‘‘देशात महागाईचा भडका उडाला असून त्याला केंद्र सरकार कारणीभूत आहे.; बाळासाहेब थोरात

पुणे : ‘‘देशात महागाईचा भडका उडाला असून त्याला केंद्र सरकार कारणीभूत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा,’’ अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात केली. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात शहर काँग्रेसच्यावतीने थोरात यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी टिळक चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. जीवनावश्‍यक वस्तूंची गुढी उभारून या वेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

थोरात म्हणाले,‘‘भाजपच्या नेत्यांना आता जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांत महागाईबद्दल असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होईल.’’बागवे म्हणाले, ‘‘सणासुदीच्या काळात भाववाढ करून मोदी सरकारने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे.’’आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, आबा बागूल, संजय बालगुडे, दीप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, लता राजगुरू आदी आंदोलनात सहभागी झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply