पुणे : देशाचे प्रादेशिक अखंडत्व जपण्यासाठी सज्ज रहा ; ले. जनरल जे. एस. नैन यांचे आवाहन

पुणे : भारतीय सैन्यदलांतील पायदळाच्या सैनिकांची त्यांच्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, संकटाच्या प्रसंगी देशासाठी प्राणार्पण करण्याची तयारी आणि धाडस हे विशेष गुण आहेत. त्यांच्या वीरश्रीतून प्रेरणा घेत पुढील वाटचाल करणे आणि देशाचे प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज राहणे हीच त्यांच्या पराक्रमाला खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

७६ व्या इन्फंट्री दिनानिमित्त ले. जनरल नैन यांनी दक्षिण कमांड मुख्यालयातील राष्ट्रीय युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. सैन्यदलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या वतीने ले. जनरल आर. व्ही. कुलकर्णी यांनी पुष्पचक्र वाहून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. २७ ॲाक्टोबर १९४७ ला भारतीय लष्करातील पायदळाचे, म्हणजेच शिख रेजिमेंटच्या १ बटालियनचे जवान प्रथमच श्रीनगर विमानतळावर उतरले. त्यामुळे श्रीनगरच्या वेशीवर आलेले घुसखोर मागे वळले आणि जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानाच्या पाठिंब्याने होत असलेली घुसखोरी रोखणे शक्य झाले. म्हणूनच देशाच्या आणि भारतीय लष्कराच्या इतिहासात २७ ॲाक्टोबर हा दिवस इन्फंट्री दिवस म्हणून साजरा केला जातो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply