पुणे : दुचाकी चोरणाऱ्यांना वारजे पोलिसांनी केली अटक ; १८ गुन्हे उघड व ५ दुचाकी जप्त

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांना वारजे पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आले असून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सागर अशोक चव्हाण (वय २७, रा. व्यंकटेश लेक लाईफ सोसायटी, दत्तनगर, कात्रज), संदीप संपत आंधळे (वय २१, रा. श्री गणेश बिल्डींग, गुजरवाडी, कात्रज), आकाश वसंत लोखंडे (वय २२, रा. रामनगर, वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कर्वेनगर भागातून काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीला गेली होती.

या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. चोरलेली दुचाकी आरोपी सागर आणि आकाश यांनी एका गॅरेजमध्ये दुचाकी ठेवली होती.याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चव्हाण, आंधळेला पकडले. चौकशीत साथीदार आकाश लोखंडेचे नाव निष्पन्न झाले. चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

चोरट्यांनी वारजे, एरंडवणे, सिंहगड रस्ता, हडपसर, वाकड, चतु:शृंगी, हिंजवडी, पिंपरी भागातून दुचाकी लांबविल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे, रामेश्वर पार्वे, मंदार शिंदे, प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ, अमोल राऊत आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply