पुणे : दिवे घाटातील पालखी मार्गाच्या कामाला वनखात्याची परवानगी

उंड्री : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (13.250 किमी लांबीचा) कामाला (भेकराईनगर, फुरसुंगी, मंतरवाडी, उरुळी देवाची, वडकी, दिवेघाट) वनखात्याची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे पालखी मार्गाच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. पालखी महामार्ग पूर्ण झाल्यास नागरीकांची मोठी सोय होणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

खासदार सुळे म्हणाल्या की, पालखी मार्ग लवकर व्हावा यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या प्रयत्नांना यश येत अखेर प्रशासकीय अडचणी मिटल्या असून लवकरच रस्त्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गाचा दिवे घाटातील भाग वन खात्याच्या हद्दीत येत असल्यामुळे येथे तांत्रिक अडचणी येत होत्या. घाटातील रस्ता रुंदीकरणास वन खात्याची परवानगी मिळत नव्हती. याबाबत खासदार शरद पवार यांनीसुद्धा नुकतीच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली होती. यानंतर अखेर वनखात्याची मंजूरी मिळाली असून, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. पालखी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर हजारो वाहनचालकांची गैरसोय दूर होणार आहे. पालखी मार्गासाठीच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

पालखी मार्गाचे काम लवकरच झाल्यानंतर दिवेघाट-मंतरवाडी चौक दरम्यानच्या वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही. कोंडीत अडकल्यानंतर तूतू मैमैचे प्रकार होणार नाहीत. रस्ता रुंदीकरणामुळे पावसाळ्यात होणारे अडथळेही दूर होतील.

राष्ट्रीय महामार्ग तांत्रिक विभागाचे व्यवस्थापक अनिल गोरड म्हणाले की, तुकाईदर्शन-दिवेघाट पालखी मार्ग 13.250 किमी लांबीचा होणार आहे. स्टेज-1च्या मंजुरीचे प्रकरण अंतिम टप्प्यात असून, 15 डिसेंबरपर्यंत निविदा जाहीर करण्याचे काम प्रस्तावित आहे. मार्च 2023 पर्यंत काम सुरू करण्याचे प्रयोजन आहे, असे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply