पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरात ५१ हजार दीप उजळून दीपोत्सव

पुणे : आकर्षक रंगातील ५१ हजार दीप उजळून सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. दिव्यांची आरास आणि विविध रंगांतील फुलांची सजावट अशा मंगलमय वातावरणात फुलांच्या एका विशेष रंगावलीतून विश्वशांतीचा संदेशही यानिमित्ताने देण्यात आला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ या वेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल उपस्थित होते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक वेशभूषा करून देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी या दीपोत्सवात सहभाग घेतला. अमिता अग्रवाल म्हणाल्या, सर्वत्र शांततेसाठी शोधाशोध सुरू आहे. जगभरात सर्वत्र संघर्षाचे वातावरण आहे. त्यामुळे भारतासह जगभरात शांतता नांदावी यासाठी विश्वशांतीचा संदेश देणारी रंगावली साकारण्यात आली आहे. दीपोत्सवाच्या प्रकाशात संपूर्ण जग सुख आणि समाधानाने उजळून निघू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply