पुणे ते बेंगळुरू नवा राष्ट्रीय महामार्ग गडकरींची ‘एक्सप्रेस’ घोषणा

सांगली : पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात बंद पडतो. भविष्यात आता या मार्गावर हे संकट येणार नाही. आपण पुणे ते बंगळूरू नवा राष्ट्रीय महामार्ग (Pune Bangalore Highway) बांधण्याचे निश्‍चित केले असून ४० हजार कोटी रुपयांचा नवा रस्ता खंडाळा, फलटण, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या दुष्काळी टापूतून जाईल. भविष्यात मुंबई पुणे रस्ता पुण्याच्या रिंगरोडला जोडल्यानंतर हाच मार्ग मुंबई ते बंगळुरू असा होईल, अशा मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रीनितीन गडकरी यांनी आज येथे केली.

पेठे ते सांगली या बहुचर्चित रस्त्याच्या कामाची निविदा येत्या चार महिन्यांत काढू आणि तातडीने हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना दिले. येथील नेमिनाथनगरच्या क्रीडांगणावर ‘बोरगाव ते वाटंबरे’ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे आणि सांगोला ते जत साखळी मार्गाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री जयंत पाटील खासदार संजय पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुभाष देशमुख, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विक्रम सावंत, सदाभाऊ खोत ,अरुण लाड, गोपीचंद पडळकर , माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील आदी व्यासपीठावर होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply