पुणे: ‘जीवनसाथी डॉट कॉम’वर पार्टनर शोधण्याच्या नादात वृद्धाने गमावले 16 लाख

पुणे: पुण्यातील वाघोली परिसरामध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची जीवन साथी डॉट कॉम या वेब साईट वर जवळपास 16 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.  या प्रकरणात  ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारी वरुण लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नी व मुलाशी पटत नसल्याने वाघोली परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकांनी जीवनसाथी डॉट कॉम वर एक जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकाला काही महिलांनी लग्न करण्यासाठी संपर्क साधून वेळोवेळी पैश्याची मागणी करुण लग्न न करता जवळपास 16 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपले सेवा निवृत्ती चे सोळा लाख रुपये उतारवयातील जोडीदाराच्या नादात गमावले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *