पुणे : जिल्हा आरोग्य विभागात ८०१ जागांची भरती ; राज्य सरकारची मान्यता

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पाच संवर्गातील पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे ८५९ पैकी ८०१ रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या पदांच्या भरतीसाठी आणि जिल्हा स्तरावर जिल्हा निवड समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीकडून आरक्षणनिहाय पदे भरली जाणार आहेत. याबाबतची जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक आदी संवर्गातील पदे जिल्हा परिषद पातळीवर भरली जाणार आहेत. आरोग्य विभागात विविध पदांचे १२ संवर्ग आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवक (संवर्ग), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, छायाचित्रकार, अवैद्यकीय पर्यवेक्षक, आरोग्य सहायक (पुरुष आणि महिला) आदींचा समावेश आहे. यापैकी पाच संवर्गातील जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

या पदांची भरती
आरोग्य सेवक २६२, आरोग्य सेविका ५०३, औषध निर्माता २९, प्रयोगशाळा तंत्रज्ञ चार, आरोग्य पर्यवेक्षक तीन अशी एकूण ८०१ पदे भरली जाणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply