पुणे : जयकुमार गोरे यांच्या भेटीसाठी शरद पवार रुग्णालयात

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पवार यांनी गोरे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे राज्यातील राजकारणाचे वेगळे दर्शनही घडले.

भाजपचे आमदार गोरे यांच्या गाडीला सातारा येथे तीन दिवसांपूर्वी पहाटे सव्वातीन वाजता अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक नेत्यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रुग्णालयात जाऊन गोरे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *