पुणे – ग्रीन कॉरिडॉरद्वारे कोल्हापूरवरू अवयव अडीच तासांत पुण्यात

पुणे - जेमतेम २५ वर्षांच्या ‘ब्रेन डेड’ मुलाच्या नातेवाईकांनी अवयवदानाला परवानगी दिली आणि हृदय घेऊन कोल्हापूरवरून निघालेली रुग्णवाहिकाअवघ्या १५० मिनिटांमध्ये पुण्यात पोचली. तातडीने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Heart Transplant Surgery) करून एका रुग्णाचे प्राण वाचविण्यात पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले.

कोल्हापूर ते पुणे हे २७० किलोमीटर अंतरचे ग्रीन कॉरिडॉर हृदय आणि मूत्रपिंड पुण्यातील रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी आणले. हृदय सह्याद्री रुग्णालयातील रुग्णाला आणि मूत्रपिंड पूना हॉस्पिटलमधील गरजूला प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच, यकृत आणि दुसरे मूत्रपिंड कोल्हापूर येथील रुग्णाला शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपित करण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश मिळाले.

जेमतेम वयाच्या पंचविशीतील एक मुलगा कोल्हापूर परिसरात प्रवास करताना गतीरोधकावर झालेल्या अपघातात नेमका डोक्यावर पडला. अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याच्या मेंदूला मार लागल्याने त्याने उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे (ब्रेन डेड) कोल्हापूरमधील डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर अवयव दान करण्याच्या आवाहनाला त्याच्या नातेवाइकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन्ही मूत्रपिंड, हृदय आणि यकृत असे अवयव दान करून चार रुग्णांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञ यशस्वी झाले.

वीज वितरण कंपनीत करार पद्धतीवर काम करणारा हा तरुण पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण वेळ कामावर रुजू होणार होता. पण, याच दरम्यान हा प्राणघातक अपघात झाला. त्याचा मोठा भाऊ मानसिक आजारी आहे. त्याचे आई-वडील ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे घराचा आधार असलेला आपला मुलगा दान अवयवाच्या रूपात आपल्यामध्ये राहील, या भावनेने हे कुटुंब अवयव दानासाठी तयार झाले.

पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात डॉ. मनोद दुराईराज यांच्या पथकाने हृदय प्रत्यारोपण केले. त्यामुळे एका रुग्णाचे प्राण वाचविले.

पुण्यात या वर्षी झालेले हे पहिले हृदय प्रत्यारोपण आहे. कोल्हापूरवरून ग्रीन कॉरिडॉर करून हे अवयव पुण्यात आणले. त्यातून पुण्यातील दोन आणि कोल्हापूर येथील दोन अशा चार रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply