पुणे : ग्राहकांना पूर्ण थाळी देऊन हाॅटेलमधील रोखपालाकडून तीन लाखांचा अपहार; रोखपालाच्या विरोधात गुन्हा

पुणे : हाॅटेलमधील ग्राहकांना पूर्ण थाळी देऊन मालकाकडे अर्धी थाळीची बतावणी करुन रोखपालाने तीन लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रोखपालाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिद अन्सारी (वय २६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रोखपालाचे नाव आहे. याबाबत रवींद्र कासट (वय ४८, रा. एरंडवणे) यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कासटे यांचे सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन माॅलमध्ये महाराजा भोग थाळी हाॅटेल आहे. आरोपी अन्सारी त्यांच्या हाॅटेलमध्ये कॅशिअर म्हणून काम करत होता. हाॅटेलमध्ये ग्राहकांना पूर्ण थाळी देऊन अन्सारी त्यांच्याकडून पैसे आकारत होता.

ग्राहकांना अर्धी थाळी दिल्याचे सांगून अन्सारीने गेल्या काही महिन्यात तीन लाख रुपयांचा अपहार केला. कासट यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी शेरू वाघवले तपास करत आहेत.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *