पुणे : ग्रामदैवताच्या हिशोबाच्या पैशातून पिक्चर बघितला; भावाने भावावर तलवारीने हल्ला केला

पुणे : गावच्या ग्रामदैवताच्या पैशांच्या हिशोबात गैरवापर केल्याचा आरोप करत चुलत भावाने तलवारीने जिवघेणा हल्ला करत, एकाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथे गावच्या ग्रामदैवताचा हिशोब न देता त्या पैशातुन पिक्चर पहायला केल्याचा राग मनात धरुन भावकीतील तरुणाने एका चुलत भावालाच तलवारीने वार करत जिवेमारण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात निलेश गावडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून आरोपीअक्षय गावडे विरोधात मंचर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे गावडेवाडीत श्रीराम मंदीराचे सभा मंडपाच्या कामाचा हिशोब दिला नाही व त्या पैश्याचा वापर कार्यकर्त्यांनी पिक्चर पाहण्यासाठी केल्याचा राग मनात धरून, आरोपी अक्षय गावडे यांने आपल्या हातातील तलवार निलेश गावडेला मारली मात्र त्याने मारलेली तलवार निलेशने पकडण्याचा प्रयत्न केला तरीही त्याच्या हातासह तोंडावर आणि कानाला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. आरोपी विरोधात भादवि कलम ३२४, ५०६, आर्म अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply