पुणे – गिर्यारोहणाची आवड असणारी प्रियम पुन्हा परतलीच नाही !

पुणे - लहानपणापासूनच गिर्यारोहणाची (Mountaineering) आवड असलेली प्रियम. (Priyam Rathi) अनेक गड-किल्ल्यावर तिने यशस्वी चढाई केलेली, शनिवारीही ती अशीच भ्रमंती करण्यासाठी घराबाहेर पडली आणि पुन्हा घरी परतलीच नाही, कायम हसतमुख असणारी, इतरांच्या आयुष्यात आनंद पेरणारी प्रियम एका अपघातात (Accident) गेली आणि तिच्या कुटुंबावर अक्षरशः दु:खाचा डोंगर कोसळला !

प्रियम सत्येंद्र राठी (वय. २०, रा.नारायण पेठ) असे तिचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्ते व लेखक सत्येंद्र राठी यांची प्रियम ही मुलगी. प्रियमला लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड होती. त्यामुळे बालपणापासूनच तिने अनेक गड-किल्ले सर केले होते. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून प्रियम शिवमुद्रा ढोल ताशा पथकामध्ये वादन करीत होती. वडिलांमुळे सामाजिक कार्याची आवड असल्याने प्रियम सामाजिक कार्यातही सक्रिय होती.

प्रियम एमईएस गरवारे महाविद्यालयात मास मीडिया कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. भटकंतीची मोठी हौस असणारी प्रियम शनिवारीही अशीच भटकंतीसाठी घराबाहेर पडली, मात्र ती पुन्हा कधीच परतली नाही, तिच्या अपघाती मृत्युने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजेजवळ शनिवारी सायंकाळी पावणेचार वाजता कार व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात प्रियम व अन्य तिघाचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंब दुःखात बुडाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply