पुणे : गणेशखिंड रस्त्यावर वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू ; वाहनचालक पसार

पुणे :  भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौकात घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे वय अंदाजे ४० वर्ष असून तो फिरस्ता असावा. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार राजू भिसे यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विद्यापीठ चौकातून मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास पाषाण रस्त्याकडे जात असलेल्या पादचाऱ्याला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक चाळके तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *